Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra MLC Election : कोकणात मविआला मोठा धक्का, भाजपचे म्हात्रे विजयी

Maharashtra MLC Election : कोकणात मविआला मोठा धक्का, भाजपचे म्हात्रे विजयी

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या (Legislative Council) नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यातील कोकण शिक्षक मतदारसंघाचा पहिला निकाल हाती आला आहे…

- Advertisement -

कोकण शिक्षक मतदारसंघातून (Konkan Teacher Constituency) भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) आघाडीवर असून विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यांनी शेकापचे व मविआने पाठिंबा दिलेले उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांना पिछाडीवर टाकले आहे. म्हात्रे यांना २० हजार ६४८ तर पाटील यांना ९ हजार ७६८ मते मिळाली आहेत. म्हात्रे यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून या विजयामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.

नाशिक पदवीधर निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार केला नाही? शुभांगी पाटील म्हणाल्या…

यावेळी म्हात्रे म्हणाले की, कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला असून सर्वांचे आभार मानतो. तसेच गेल्या ६ वर्षांतल्या कामाची पोचपावती शिक्षकांनी दिली असून मला ३३ संघटनांचा पाठिंबा होता. माझ्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी दाखवलेला विश्वास आज सुफळ झाला असून आज हा विजय झाला, असे त्यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे बाळाराम पाटील (Balaram Patil) म्हणाले की, कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलाने मान्य करत असून पुढे मार्गक्रमण करण्याचा विचार आहे. तसेच या निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनो बातमी तुमच्यासाठी! दहावी-बारावीच्या परीक्षांपूर्वी बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

- Advertisment -

ताज्या बातम्या