Friday, April 26, 2024
Homeनाशिकभाजपचे मिशन २०२४ : मतदारसंघ निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या; नाशिक, दिंडोरीसाठी 'यांना' संधी

भाजपचे मिशन २०२४ : मतदारसंघ निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या; नाशिक, दिंडोरीसाठी ‘यांना’ संधी

मुंबई | Mumbai

अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी (Lok Sabha and Assembly Elections) भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यानुसार भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड झालेल्या प्रमुखांची यादी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसिद्ध केली आहे…

- Advertisement -

Mira Road Murder Case : मृतदेहाचे तुकडे का केले? संशयिताने पोलिसांना दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा (MP and MLA) देखील समावेश होता. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे.

या निवडणूक प्रमुखांमध्ये भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik LokSabha Constituency) भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori LokSabha Constituency) माजी आमदार बाळासाहेब सानप यांची निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Nashik Accident News : कंटेनरच्या धडकेत दोन जैन साध्वींचा मृत्यू

दरम्यान, भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत नाशिक लोकसभेची जागा शिवसेना तर दिंडोरी लोकसभेची जागा भाजपकडे आहे. अशातच आता भाजपने नाशिक लोकसभेसाठी निवडणूक प्रमुखाची नेमणूक केली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून अनेक जण नाशिक लोकसभा लढविण्यास इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपचा (BJP) डोळा आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या