Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याविधानपरिषद निवडणूक : भाजपकडून पंकजा मुडेंचा पत्ता कट; 'या' उमेदवारांना संधी

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून पंकजा मुडेंचा पत्ता कट; ‘या’ उमेदवारांना संधी

मुंबई । Mumbai

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Elections) भाजपने (bjp) आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) भाजप नेते श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiya) उमा खापरे (Uma Khapre) प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा समावेश आहे…

- Advertisement -

तसेच या निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषदेवर (MLC) संधी दिली जाईल असे म्हटले जात होते. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नसल्याने पंकजा मुंडेंसाठी हा एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही विधानपरिषदेवर संधी दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र,त्यांनाही भाजपने उमेदवारी दिलेली नाही.

दरम्यान, विधानपरिषदेच्या एकूण १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक (Election) होणार आहे. तसेच या निवडणूकीसंदर्भात २ जूनला अधिसूचना (Notification) जाहीर झाली आहे. त्यानंतर ९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या