Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याLok Sabah Election 2024 : आगामी लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर;...

Lok Sabah Election 2024 : आगामी लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक

नवी दिल्ली | New Delhi

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भारतीय जनता पक्षाने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे जेष्ठ नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. नुकतीच दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मॅरेथॉन बैठक झाली होती. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झाले होते. त्यानंतर आज आगामी लोकसभेसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे…

- Advertisement -

भाजपकडून १६ राज्य आणि २ केंद्रशाषित प्रदेशांमधील तब्बल १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत ३४ केंद्रीय व राज्यमंत्री देखील निवडणूक लढवणार आहेत. तर १९५ उमेदवारांमध्ये एक लोकसभा अध्यक्ष आणि दोन माजी मुख्यमंत्री यांची देखील नावे असून २८ महिलांचाही समावेश आहे. यात ५० पेक्षा कमी वय असलेले ४७ युवा उमेदवार असणार असून अनुसूचित जाती २७, अनुसूचित जमाती १८, ओबीसी ५७ अशा सर्व वर्गांना पहिल्या यादीत प्रतिनिधित्व देण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

‘या’ नेत्यांना मिळाली उमेदवारी

वाराणसी – नरेंद्र मोदी

अंदमान निकोबार – विष्णू पडा रे

अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू

अरुणाचल पूर्व – तपिर गावो

आसाम

सिलचर – परिमल शुक्ल वैद्य

गुवाहाटी – बिजुली कलिता

तेजपुर – रणजित दत्ता

नौगाव – सुरेश बोरा

दिबृगड – सर्वानंद सोनोवाल

छत्तीसगड

विलापसुर – तोखन साहू

राजनंदगाव – संतोष पांडे

रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल

बस्तर – महेश कश्यप

दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल

जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग

दिल्ली

चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल

उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी

दिल्ली – बांसुरी स्वराज

दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी

उत्तर गोवा

श्रीपाद नाईक

गुजरात

गांधीनगर – अमित शाह

राजकोट – पुरुषोत्तम रुपाला

पोरबंदर – मनसुख मांडवीय

नौसारी – सी. आर पाटील

कोडरमाल – अन्नपूर्णा देवी

हजारीबाग – मनीष जैस्वाल

केरळ

कासरगोड – एम एल अश्विनी

कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण

कोझिकोडे – एम टी रमेश

त्रिशुर – सुरेश गोपी

अल्पुझा – शोभा सुरेंद्र

अटींगल – वी मुरलीधरन

मध्यप्रदेश

गुना – ज्योतिरादित्य सिंधिया

भोपाल – देवल शर्मा

बिकानेर – अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)

अलवर – भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)

भरतपूर-रामस्वरुप कोहली

जोधपूर – गजेंद्र सिंह शेखावत

चित्तोडगड – सी पी जोशी

कोटा- ओम बिर्ला

तेलंगणा

करीमनगर-बंडी संजयकुमार

निझामाबाद – अरविंद धर्मापूरी

त्रिपुरा – विप्लव कुमार देव

नैनिताल – अजय भट ( केंद्रीय मंत्री)

गौतम बुद्धनगर – डॉ महेश शर्मा

बुलंद शहर – भोला सिंह

मथुरा – हेमा मालिनी

एटा – राजू भैय्या

खिरी – अजय मिश्रा टेनी

उत्तरप्रदेश

उनाव – साक्षी महाराज

लखनऊ – राजनाथ सिंह

अमेठी – स्मृती इराणी

कनौज – सुब्रत पाठक

गोरखपूर – रवी किशन

पासगाव – कमेलश पासवान

जौनपुर – कृपा शंकर सिंह

कोणत्या राज्यातील किती जागा?

उत्तर प्रदेश- ५१

पश्चिम बंगाल – २०

मध्य प्रदेश – २४

गुजरात – १५

राजस्थान – १५

केरळ – १२

तेलंगणा – ९

आसाम – ११ (एकूण जागा १४)

झारखंड – ११

छत्तीसगड – ११

दिल्ली – ५

जम्मू – काश्मीर – २

उत्तराखंड – ३

अरुणचाल प्रदेश – २

गोवा – १

त्रिपुरा – १

अंदमान – निकोबार – १

दीव आणि दमण -१

- Advertisment -

ताज्या बातम्या