
मुंबई | Mumbai
येत्या महिन्यात विधानपरिषदेच्या (Legislative Council) ५ जागांसाठी निवडणूक (Election) होत असून या निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) ३ जागांसाठी उमेदवारांची (Candidates) घोषणा करण्यात आली आहे...
यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये कोकण विधानपरिषदेसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना तर पश्चिम विदर्भातून रणजीत पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातून पदवीधरसाठी अजून उमेदवार जाहीर केलेला नसून त्याबाबत एक दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, यासोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाकरिता भाजपने उमेदवार जाहीर केलेला नसून याठिकाणी स्वतः निवडणूक लढवावी असा सूर स्थानिक नेत्यांचा आहे. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विभागातील भाजप आमदारांची मते जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामध्ये बहुसंख्य आमदारांनी (MLA) ना गो गाणार यांच्या उमेदवारीला पसंती दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप ना गो गाणार यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.