Friday, May 10, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात मुलींचा जन्मदर ९६१ वर

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर ९६१ वर

नाशिक । खंडू जगताप Nashik

जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने गेली चार वर्षात सातत्याने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमामुंळे हे साध्य झाले आहे. सध्या सरासरी १००० मुलांमागे ९६१ इतका झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यासह राज्यभरातही मागील चार वर्षांपुर्वी मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात घसरला होता. २०१६ मध्ये जिल्ह्यात हे प्रमाण सरासारी हजार मुलांमागे ९१३ मुली इतके होते. तर काही तालुक्यात हे प्रमाण ८५० इतके होते. याच्या परिणामी मुलींचा जन्मदर अत्यंत कमी असलेल्या देशभरातील १०० जिल्ह्यांमध्ये नाशिकचा सामावेश होता. याबाबत तात्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विशेष उपायोजना राबवण्यात आल्या होत्या.

यामध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष गुप्त समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार गर्भलिंगनिदान करणार्‍या अनेक डॉक्टरांवर कारवायी करण्यात आल्या आहेत. यासह नागरीकांमध्ये विविधपातळीवर लिंग भेद न पाळण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली .

सध्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर १ हजार मुलांमागे ९६१ इतका आहे. यामध्ये आदिवासी बहुल समजल्या जाणार्‍या पेठ व कळवण तालुक्यांमध्ये जन्मदर उत्कृष्ट असून येथे मुलींचे प्रमाण हे मुलांपेक्षा जास्त आहे. मात्र दुसरीकडे सिन्नर तालुक्यात मात्र सर्वात कमी प्रमाण आहे. २०१७ मध्ये नाशिक जिल्ह्यात दरहजारी मुलांमागे ९२५ मुलींचा जन्मदर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यावेळी सिन्नर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ८४४ पर्यंत मुलींचा जन्मदर घसरला होता. ही बाब आरोग्य विभागाने रडारवर घेतली.

कमी जन्मदर असल्याचे कारणे शोधण्यासाठी, अनाधिकृत गर्भपातासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आली. हळुहळु मुलींचा जन्मदर आता ८७३ इतका झाला आहे. यामध्ये वाढ होत आहे, मात्र जिल्ह्याच्या तुलनेत फरक मोठा असल्याचे एका अधिकार्‍याने स्पष्ट केले. आमचे प्रयत्न सातत्याने सुरू असून, जनजागृतीसह कायदेशीर कारवाईचे पर्याय निवडले जातात. सध्या आरोग्य यंत्रणा करोनाशी सामना करण्यात व्यस्त असली तरी या गंभीर प्रकारांकडे आमचे पूर्ण दुर्लक्ष झालेले नसल्याचे संबंधित अधिकार्‍याने स्पष्ट केले.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढत आहे. याबाबत समाधान होत आहे. यासाठी आरेाग्य विभागाने लक्ष पुरवून गुप्त विशेष समितीमार्फत जिल्ह्यात धडक कारवाई केली होती. गर्भलिंगनिदान करणार्‍या डॉक्टरांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांनी चांगले प्रयत्न केले आहेत.

डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

तालुका मुलींचे दर हजारी प्रमाण

बागलाण – ९८८

देवळा – ९५३

इगतपुरी- ९३९

मालेगाव- ९५४

नाशिक- ९४६

पेठ- १०३४

सुरगाणा- ९४०

येवला- ९५३

चांदवड- ९८९

दिंडोरी- ९६५

कळवण- १००६

नांदगाव- ९९२

निफाड- ९८४

त्र्यंबकेश्वर- ९२१

सिन्नर- ८७३

- Advertisment -

ताज्या बातम्या