मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यातील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट, इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई देणे, यासाठी रोग नियंत्रणाच्या आँपरेशनल कॉस्ट अंतर्गत १ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले आहेत,असे केदार यांनी सांगितले.

आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे प्रती पक्षी २० रूपये , आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी ९० रुपये, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी २० रुपये, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी ७० रुपये, कुक्कुट पक्षांची प्रती अंडी ३ रुपये,

कुक्कुट पक्षी खाद्य प्रती किलोग्रॅम १२ रुपये, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक ३५ रुपये, सहा आठवड्यावरील बदक १३५ रुपये, अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परीघातील कुक्कुट पालकांना नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचे केदार म्हणाले.