Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातही बर्ड फ्लूची एन्ट्री: परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

महाराष्ट्रातही बर्ड फ्लूची एन्ट्री: परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

परभणी

परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील ८०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येनं कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली व मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुरुंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

लातूरमध्ये ४०० कोंबड्यांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात १० जानेवारी रोजी पोल्ट्री फार्ममधील ४०० कोंबड्या अचानकपणे दगावल्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करुण नमुने घेतले असून कोंबड्या दगावल्याने लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अहवाल येईपर्यंत दहा किलो मिटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. केंद्रवाडी गावात वाहनांना ये -जा करण्यास देखील मनाई करण्यात आली असून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी असे आदेश काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या