
नाशिक | Nashik
शहरातील बिपीन बाफना (Bipin Bafna) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण (Abduction) करून त्याची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना जून २०१३ मध्ये घडली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती...
अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Additional Sessions Court) दोघांना दोषी ठरवत अन्य तिघांविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. आता न्यायालयाने दोघा दोषींना शिक्षा ठोठावली आहे...
न्यायालयाने चेतन यशवंत पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा,केवडीबन, पंचवटी) यांना दोषी ठरविले. तर अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१, रा.नांदुरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा. भारतनगर, वडाळारोड) यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता न्यायालयाने दोघा दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. अजय मिसार यांनी काम बघितले
दरम्यान, ८ जून २०१३ रोजी मयत बिपीन गुलाबचंद बाफना हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून घरातून गेला होता. त्यानंतर बिपीनचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण करत मोबाईलवरून फोन करून त्याच्या वडिलांकडून एक कोटी रुपयांची खंडणी (Extortion) मागितली होती. यानंतर पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या दोषींनी बिपीन बाफना याची निर्घृणपणे हत्या केली.