Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअडीच तासापुर्वी मंत्रीपदाची सुत्र घेतली अन् भ्रष्टाचाराचा आरोपावरुन दिला राजीनामा

अडीच तासापुर्वी मंत्रीपदाची सुत्र घेतली अन् भ्रष्टाचाराचा आरोपावरुन दिला राजीनामा

पाटणा

बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेल्या एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. त्यांच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

डॉक्टर मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी शिक्षणमंत्रीपदाची सूत्र घेतली. परंतु अडीच तासांनी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन राजीनामा द्यावा लागला. भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेले शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवार पदभार स्वीकारल्यानंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलपती असताना भरती घोटाळा केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. मेवालाल चौधरी २०१५ मध्ये पहिल्यांदा जदयूकडून आमदार म्हणून निवडून आले होते. ते कुलपती असताना कृषी विद्यापीठात २०१२ मध्ये सहाय्यक प्राध्यपक आणि ज्यूनिअर वैज्ञानिकांची भरती झाली होती. या नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप कऱण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या