बिहारमध्ये तीन टप्प्यात मतदान : करोनामुळे अनेक नवीन नियम

प्रचारापासून सर्वच काही ऑनलाईन
assembly election
assembly election

नवी दिल्ली

बिहार विधानसभेच्या ( bihar assembly election) निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने (election commission of india) केली. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुका जाहीर केल्या. करोनाकाळात सर्व नवीन नियमाने होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. दिवाळीपुर्वीच निकालही येणार आहे.

करोनामुळे जगभरातील ७० देशांनी निवडणुका टाळल्या आहेत. भारतात करोनाचा धोका वाढलेला असताना पहिल्याच मोठ्या निवडणुका होत आहेत. यामुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्वास अधिकच दृढ होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होत आहे. या २८ ऑक्टोंबर, ३ नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर या तारखांना मतदान होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पहिला टप्पा ७१ जागा - २८ ऑक्टोंबर

दुसरा टप्पा ९४ जागा - ३ नोव्हेंबर

तिसरा टप्पा ७८ जागा - ७ नोव्हेंबर

बिहारमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. गेल्या निवडणुकीत पाच टप्प्यांत मतदान पार पडले होते. आता यंदाच्या निवडणुकीत करोना गार्डलाईन्सचा पालन हेच मोठे आव्हान आहे.

assembly election
मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका २९ नंतर जाहीर होणार

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

निवडणुका रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मागील महिन्यातही न्यायालयाने अशी मागणी फेटाळली होती. करोनामुळे एका राज्यातील निवडणुका टाळता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

२०१५ मधील परिस्थिती

रजद ८०

जदयू ७१

काँग्रेस २७

भाजप ५३

इतर १२

करोना रुग्ण मतदान करणार

- मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी करण्यात आली. आता एका केंद्रावर एक हजार मतदार असतील

- सुरक्षेचे नवीन नियम या निवडणुकीत असतील.

- ७ फेब्रवारी २०२० रोजी जाहीर झालेली मतदार यादी या निवडणुकीत वापरणार

- ४६ लाख मास्कचा वापर होणार, ६ लाख पीपीई कीट वापरणार, २३ लाख ग्लौब्स, ६ लाख फेस शिल्ड

- बिहारमध्ये ७ कोटी ७९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

- सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान

- पाच पेक्षा जास्त जण घरी जाऊन प्रचार करणार नाही.

- करोना रुग्णही करु शकणार मतदान, मतदानाच्या शेवटच्या वेळेत करोना रुग्णांचे मतदान

- ‌उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणार

-निवडणूक प्रचार व्हर्च्युअल होणार

- रोड शो मध्ये फक्त पाच गाड्या असतील

- ‌उमेदवारांना वृत्तपत्रातून गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com