आघाडी एनडीएची पण, बिहारचा सामना सुपर ओव्हरमध्ये जाणार?

तेजस्वी-नितेश
तेजस्वी-नितेश

पाटणा

बिहार विधासभा निवडणुकीत एनडीए व महाविकास आघाडीत ‘काटे की टक्कर’ सुरु आहे. सध्या एनडीएची आघाडी असली तरी हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण...

बिहारमधील चार जागांवर फक्त २०० मतांचा फरक आहे. ३२ जागांवर २ हजार मतांचा फरक आहे तर ४८ जागांवर जय-पराजयचा निर्णय ३००० मतांचा फरकावर आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एनडीए १२४ तर महाविकास आघाडी १११ जागांवर आघाडीवर आहेत.बिहारमधील ४.१ कोटीपैकी २.५ कोटी मतांची मतमोजणी पुर्ण झाली आहे.

आघाडी आणि गठबंधनापलीकडे जाऊन प्रत्येक पक्षाची कामगिरी स्वतंत्रपणे जोखली तर मुख्यमंत्रिपदाचे दोन्ही दावेदार निष्प्रभ ठरू शकतील, अशी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता अधिक आहे. बिहार निवडणूक निकालांच्या आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांवरून सर्वात जास्त स्ट्राइक रेट डाव्यांनी (Left parties in Bihar) मारला आहे. त्याखालोखाल भाजपची कामगिरी (BJP seats in Bihar) चांगली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूची कामगिरी सर्वात सुमार झाली आहे आणि राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्या पक्षाची कामगिरीही फार चांगली झालेली नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा या दोन्ही पक्षांना कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.

याउलट भाजप आणि डाव्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वाधिक चांगली कामगिरी डाव्यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com