मतदार याद्यांबाबत नाशिककरांसाठी मोठी अपडेट

मतदार याद्यांबाबत नाशिककरांसाठी मोठी अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Nashik NMC ELection) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूचनेवरून महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी (Draft Voter List) प्रसिद्ध केली होती तसेच त्याच्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या...

इतिहासात पहिल्यांदाच 3847 एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. दरम्यान हरकतींच्या निपटारा करण्यासाठी मनपा आयुक्तांनी 44 पथके तयार केली होती.

त्यांनी या हरकतींची तपासणी केली असून ज्या लोकांचे पत्ते विधानसभा मतदार यादीत ज्या जागी असेल त्याच ठिकाणी राहणार आहे. यामुळे हरकत घेणाऱ्यांपैकी अशा लोकांचे नाव अंतिम यादीतही त्याच ठिकाणी राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ज्यांनी विधानसभा मतदार यादीत आपले नाव दुरुस्ती करून नवीन जागेचा पत्ता दिला असेल व विधानसभेच्या यादीत ज्या ठिकाणी नाव असेल त्याच ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीत देखील नाव राहणार आहे.

तसेच स्थळ पाहणीमध्येदेखील याबाबतची तपासणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी लोकांनी अनेक वर्षांचे पुरावेदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सादर केले आहे. कागदपत्रांची तपासणी करूनच विधानसभा मतदार यादी प्रमाणे प्रभाग बदलण्यात येणार असल्याचे समजते.

दि. 23 जून 2022 प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन 1 जुलै पर्यंत त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या, मात्र वेळ कमी असल्यामुळे मुदत वाढ मिळावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती.

त्यानुसार 3 जुलैपर्यंत हरकती घेण्यास मुदत वाढ मिळाली होती. या काळात तब्बल 3 हजार 847 हरकती प्राप्त झाल्या. यामध्ये 351 हरकती या ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहे.

सर्व आलेल्या हरकती विभागनिहाय वाटप करण्यात येऊन 44 पथकांच्या मार्फत त्यांच्या निपटारा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. तर 16 जुलै रोजी अंतिम मतदार यादी (Final Voting List) प्रसिद्ध करायची होती.

याला देखील आयोगाने मुदतवाढ देत 21 जुलैला अंतिम यादी घोषित करण्याचे आदेश दिले आहे. आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीनशे अधिकारी व सेवकांची या कामी नियुक्ती केली होती.

दरम्यान स्वतः आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांच्यासह प्रशासन उपायुक्त मनोज घोडे -पाटील आदींनी शहरात तपासणी पथक योग्य पद्धतीने आपले काम करीत आहे की नाही याचे क्रॉस चेक करण्यासाठीदेखील आढावा घेतला. तसेच आयुक्त व वरिष्ठ अधिकारी थेट तक्रारदारापर्यंत देखील गेले होते.

सर्वाधिक तक्रारी नवीन नाशिकमधून

३ जुलै पर्यंत ३ हजार ८४७ हरकती दाखल झाले आहेत. नवीन नाशिक विभागातून तब्बल दोन हजार ४३३ तर पूर्व विभागात २८४, पश्चिम विभागात ४६, पंचवटी विभागात ३९६, नाशिकरोड विभागात २२२, सातपूर विभागात १५५, तर महापालिकेच्या ट्रू वोटर्स ॲपवर ३५१ याप्रमाणे हरकती आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com