Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली 'ही' मोठी अपडेट

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या ४० आमदारांसह (MLA) बंड केल्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर बहुमत चाचणीच्या (Majority Test) अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisement -

यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर १६ मार्च रोजी राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रजूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी लागणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

भाजपसोबत जाणार का? अजित पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले…

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या सत्तासंघर्षाची (Power Struggle) सुनावणी ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली आहे. त्यामुळे सहसा एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी (Hearing) घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो. तर जास्तीत जास्त किती कालावधी लागेल याची काही शाश्वती नसते.

राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हिंमत असेल तर…

परंतु, राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणामधील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शाह निवृत्त होण्याच्या किमान एक दिवस आधी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोठी बातमी! म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला; १०० जणांचा मृत्यू

तर दुसरीकडे २० मे पासून सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु होत असून त्या २ जुलै पर्यंत असणार आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकाल लागण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या