Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशमहिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा!

महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा!

दिल्ली | Delhi

सततच्या महागाईने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेला सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.

- Advertisement -

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात (commercial LPG Cylinder Price) १९८ रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर आजपासून (१ जुलै) लागू होईल. या दर कपातीमुळे १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत २,०२१ रुपयांवर आला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. याआधी जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दोनदा दणका बसला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या