मोठी बातमी : ‘अल कायदा’चे दोन दहशतवादी लखनऊमध्ये ताब्यात

मोठी बातमी : ‘अल कायदा’चे दोन दहशतवादी लखनऊमध्ये ताब्यात

लखनऊ | Lucknow

येथील एका घरात दहशतवादी (Terrorist) लपून बसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (ATS) मिळाली. तेथील काकोरी पोलीस ठाणे (Kakori Police Thane) परिसरातील एक घराला एटीएसने वेढा घालत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या...

दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेचे (Al Qaeda terrorists) असल्याची माहिती समोर आली आहे. ते पाकिस्तानी हस्तक आहेत. यासोबत एटीएसच्या हाती मोठ्या प्रमाणावर स्फोटकेदेखील लागल्याने एकप्रकारे घातपातचा मोठा कट उधळला गेल्याचे सांगितले जात आहे.

एटीएसकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. या शोध मोहीमेत एटीएससोबत स्थानिक पोलीसदेखील सहभागी झाले आहेत. परिसरातील अनेक घरे देखील रिकामी करण्यात आली आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकासदेखील पाचारण करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com