USER
मुख्य बातम्या
मोठी बातमी! 'या' दोन मंत्र्यांनी दिला राजीनामा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
दिल्ली(Delhi ) सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक झाल्यानंतरही ते राजीनामा का देत नाही? अशी चर्चा सुरु होती. अखेर या दोन्ही बड्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारले आहेत.
मनीष सिसोदिया ( Manish Sisodiya)यांना दोन दिवसांपूर्वी सीबीआयने अटक केली होती. त्यांच्यावर राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती.
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन( Satyendra Jain) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे अटकेनंतर तब्बल नऊ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे समजते.