अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; धुळ्यातील तरुणाला अटक

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; धुळ्यातील तरुणाला अटक

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) नुकतेच मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या या दौऱ्यात मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे...

अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. अखेर मलबार हिल पोलिसांनी (Malabar Hill Police) या व्यक्तीला अटक (Arrested) केली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती.

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) खासदाराचा पीए असल्याचा दावा या व्यक्तीने केला असून हेमंत पवार (३२) (Hemant Pawar) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा धुळ्याचा (Dhule) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, हेमंत पवारला अमित शाह यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा होती. प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा संशय पोलिसांनी (Police) व्यक्त केला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com