Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबोर्डाचा अजब कारभार; बारावीच्या प्रश्नपत्रिकेत आले चक्क उत्तर छापून

बोर्डाचा अजब कारभार; बारावीच्या प्रश्नपत्रिकेत आले चक्क उत्तर छापून

मुंबई | Mumbai

बारावीच्या परीक्षा (HSC Exams) आजपासून सुरु झाल्या असून परिक्षेतील आज पहिला इंग्रजी भाषेचा (English Language) पेपर होता. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुक आढळल्याने मोठा घोळ पाहायला मिळाला.

- Advertisement -

पाच हजार बालवैज्ञानिकांनी साकारले हायब्रीड रॉकेट; नाशिकच्या दोन विद्यार्थिनींचा समावेश

याबाबत अधिक माहिती अशी की, बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. या पेपरमध्ये कवितेवर आधारित तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नात ए-३ आणि ए-५ क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाकडून (Maharashtra Board) छापण्यात आले नाही. तर ए-४ क्रमांकाच्या प्रश्न विचारण्याऐवजी त्याठिकाणी उत्तर छापण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये (Students) गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असून एकूण सहा गुणांच्या प्रश्नांत चुक झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बारावीच्या विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या

याशिवाय इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आणखी एक चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. तीन क्रमांकाच्या ‘बी’ प्रश्नांमध्ये कवितेचे ‘ॲप्रीसिएशन’ करण्यास सांगणारा चार गुणांचा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, ही प्रशंसा कशाच्या आधारे करायची, यासंदर्भात प्रश्नांमध्येच मुद्दे देणे अपेक्षित होते. परंतु हे मुद्दे प्रश्नपत्रिकेत देण्यात आले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी…; राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

दरम्यान, यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) आपली चूक मान्य केली आहे. पंरतु,परीक्षेच्या नियामकांकडून अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच सहा गुण देण्याचा निर्णय होईल अशी माहिती मंडळाने दिली आहे. तसेच त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असे स्पष्टीकरण देखील राज्य शिक्षण मंडळाने दिले आहे.

धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या