Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबक नगरी गजबजली; पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ

त्र्यंबक नगरी गजबजली; पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला गर्दीत मोठी वाढ झाली आहे. यात्रेकरू, पर्यटक यामुळे नगरी गजबजली आहे. यामुळे मंदिराची (Trimbakeshwar Temple) वेळ वाढवण्याची मागणी होत आहे…

- Advertisement -

आधारकार्ड, तापमान, लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी यामुळे पर्यटकांना रांगेत वेळ लागतो. देवदर्शनाची सुलभ सोय केली असली तर रांगेत दीड ते दोन तास लागतात. मंडपात आणि मंडपाच्या बाहेर दोन्हीकडे गर्दी झाल्याचे निदर्शनास येत आहे. मोफत धर्म दर्शन रांग पूर्व दरवाजा परिसरात पाहायला मिळाली.

बाहेरील रांग अहिल्या गोदावरी संगमाच्या पुढपर्यंत पोहोचली होती. सध्या सकाळी सात ते रात्री 8 पर्यंद दर्शनाची वेळ आहे. मंदिर रात्री आठला बंद होते. त्याऐवजी रात्री दोन तास मंदिराची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. मंदिर १० पर्यंत उघडे ठेवल्यास उशिरा येणाऱ्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या