मुंबईकरांसाठी क्रांतिकारी निर्णय; ५०० चौ. फुटांपर्यंत घरपट्टी माफ

मुंबईकरांसाठी क्रांतिकारी निर्णय; ५०० चौ. फुटांपर्यंत घरपट्टी माफ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

राज्य सरकारने (Maharashtra Government) मुंबईकरांना नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबईतील ५०० चौ. फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज एक ऑनलाइन बैठक बोलावण्यात आली या बैठकीत मुंबईतील घरांबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

जनतेला खोटी वचन द्यायची नाहीत असे संस्कार शिवसैनिकांवर आहेत. निवडणुकीआधी शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईकरांना ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असे आश्वासन दिले होते. ते आज पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळत आहे. आमची ही चौथी पिढी आहे. आजोबा, वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही तर मुंबईवरचे प्रेम म्हणून आम्ही पुढे नेत आहोत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नगरविकास विभागाची बैठक. बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव,

राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com