केंद्रसरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील आरोग्य सेविकांना दिलासा

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार
केंद्रसरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील आरोग्य सेविकांना दिलासा

जानोरी । वार्ताहर Janori

2021-22 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये आरोग्य सेविकेंची (ANM) (health workers ) ची पदे रद्द केली जाणार नसून यासाठी केंद्रीय आरोग्य राज्य डॉ.भारती पवार ( Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar )यांच्या माध्यमातून केंद्रसरकारने त्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सुमारे 597 आरोग्य सेविकेंना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांना शहरी भागात काम करणे शक्य आहे अशा ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्यसेविकांना शहरी भागात रुजू करून घेण्यात येणार आहे.

तसेच ज्यांना सध्याच्या ठिकाणी ठेवणे शक्य आहे त्यांना तिथेच कामावर ठेवले जाणार असून जे उरलेल्या आरोग्य सेविका कर्मचारी आहेत त्यांना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इतर ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी कामावर रुजू करून घेणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेविकेंची पदे रद्द होणार नसून त्यांना सेवेत सामावून घेतले जाईल ह्या निर्णयामुळे सर्व आरोग्य सेविकेंनी समाधान व्यक्त करत ना.डॉ.भारती पवार यांना धन्यवाद दिले यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख जी मांडवीय (Union Health Minister Mansukh G. Mandvi ) यांनी मार्गदर्शन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com