दिवाळीत आले हे आयपीओ, तुम्ही गुंतवणूक केली का?

आयपीओ
आयपीओ

दिवाळीत शेअर बाजार तेजीच्या लाटेवर स्वार होत असतांना अनेक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. त्यात बहुचर्चित पेटीएमचा आयपीओ आहे. मागील १० वर्षातील भांडवली बाजारातला हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.

आयपीओ
राष्ट्रवादीला दुसरा धक्का : अजित पवारांशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती जप्तीची नोटीस

पॉलिसी बाजार

ऑनलाइन इंश्योरेंस प्लेटफॉर्म पॉलिसी बाजार (Policybazaar) आयपीओ (IPO) गुंतवणुकीसाठी 1 नोव्हेंबर रोजी सुरु झाला. हा तीन नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. पॉलिसी बाजारची पेरेंट कंपनी PB Fintech या माध्यमातून 5,710 कोटी भागभांडवल जमा करणार आहे. ग्रे मार्केटमध्ये पॉलिसी बाजारचा आयपीओ इश्यू प्राइस 150 रुपये प्रीमियमवर आहे.

पेटीएमचा महत्वकांक्षी आयपीओ

भांडवली बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार होत तब्बल १८३०० कोटी उभारण्याचा पेटीएमचा महत्वकांक्षी प्रयत्न आहे. मागील १० वर्षातील भांडवली बाजारातला हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये कोल इंडियाने १५००० कोटी आयपीओतून उभारले होते. पेटीएमची समभाग विक्री ८ नोव्हेंबर २०२१ रोजी खुलीहोणार आहे. गुंतवणूकदारांना १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत यासाठी बोली लावला येईल. आयपीओसाठी पेटीएमकडून प्रती शेअर २०८० ते २१५० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान ६ शेअरसाठी अर्ज करता येणार आहे.

आयपीओ
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

सिगाचीची जोरदार प्रदर्शन

१ नोव्हेंबरपासून तीन आयपीओ आले. त्यातील सिगाचीला चांगला रिस्पान्स मिळाला. पहिल्याच दिवशी ९.५२ पट प्रतिसाद मिळाला. ३ नोव्हेंबर रोजी हा इश्यू बंद होत आहे. ऑनलाइन इन्शुरन्स अॅग्रीगेटर पॉलिसीबाजारची मूळ कंपनी पीबी फिनटेक लिमिटेड (PB Fintech Ltd), सुयोग गुरबक्सानी फ्युनिक्युलर रोपवेज लिमिटेड, एसजेएस एंटरप्रायझेस (SJS Enterprises Limited) आणि सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries) यांचा समावेश आहे. हे आयपीओ (IPO) ३ नोव्हेंबरला बंद होतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com