नाशिकमध्येही ‘बिग बटरफ्लाय मंथ’

नेचर कन्झर्वेशनकडून महिनाभर सर्वेक्षण
नाशिकमध्येही ‘बिग बटरफ्लाय मंथ’

नाशिक । प्रशांत निकाळे Nashik

फुलपाखरे Butterfly प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि सप्टेंबर महिन्यात त्यांची गणना वन्यजीव आणि वनस्पतींसह केली जात आहे. हि संवेदनशील फुलपाखरे जगण्यासाठी धडपडत आहेत,एक उपाय म्हणून या सुंदर प्राण्यांची ओळख करून त्यांच्या संवर्धनाची चळवळ उभी करण्यासाठी सलग दुसर्‍या वर्षी बिग बटरफ्लाय मंथ 'Big Butterfly Month साजरा केला जाणार आहे.

बिग बटरफ्लाय मंथ मध्ये सप्टेंबर महिन्यात देशभरात फुलपाखरांची मोजणी सुरू केली जाते. नाशिकमध्ये नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकचे स्वयंसेवक नाशिक जिल्ह्यात फुलपाखरांची ओळख आणि मोजणी करीत आहेत. हा महोत्सव सप्टेंबर अखेरपर्यंत देशभरात आयोजित केला जाईल आणि या क्षेत्रात काम करणार्‍या अनेक नामांकित संस्था त्यासाठी एकत्र आल्या आहेत.

गणनेदरम्यान, सर्व सहभागींनी पाहिलेल्या फुलपाखरांची नोंद बिग बटरफ्लाय मंथच्या वेबसाइटवर अपलोड करणे आवश्यक आहे. याशिवाय फुलपाखरांवर कार्यशाळा, त्यांचे छायाचित्रण, लेखन, प्रश्नमंजुषा, फुलपाखरांच्या जीवनचक्रावरील अभ्यास आणि इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीएसएन फुलपाखरू माहिती कार्यक्रमांवर वेबिनार आयोजित करत आहे. जगभरातील फुलपाखरूप्रेमींना एकत्रित जोडणे, फुलपाखरांच्या निवासस्थानांच्या निर्मितीसाठी काम करणे, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे संस्थांनी सांगितले.

यात बीएनएचएस, इंडियन फाउंडेशन फॉर बटरफ्लाय, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस आणि बटरफ्लाय ट्रस्ट यासह देशातील 27 नामांकित संस्थांनी भाग घेतला आहे. यातून देशाच्या इतर भागांप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील प्रजाती, अधिवास आणि फुलपाखरांची छायाचित्रे यांची माहिती गोळा केली जाईल आणि एकदा एकत्रित आकडेवारी संकलित केल्यानंतर ती संवर्धन चळवळीची पुढील दिशा ठरेल.

फुलपाखरे निसर्गाचा महत्त्वाचा दुवा

निसर्गात आणि जैविक साखळीत फुलपाखरांना विशेष महत्त्व आहे. फुलपाखरू हे अनेक प्राण्यांचे अन्न आहे. यामध्ये कोळी, मधमाश्या, खारीच्या विविध प्रजातींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ते काही प्रमाणात परागीकरणात देखील भूमिका बजावतात. साधारणपणे फुलपाखरू किमान दहा फुले आणि वनस्पतींची पुनर्स्थापना करते. म्हणून, या लहान प्राण्यांचे संवर्धन आवश्यक आहे.

देशभरात फुलपाखरे मोजले जात आहेत. यामध्ये संख्या मोजण्याबरोबरच नाशिकच्या प्रजातींचाही अभ्यास केला जात आहे. प्रत्येक स्वयंसेवक वैयक्तिकरित्या हे काम करेल. त्यामुळे सांघिक उपक्रम होणार नाहीत. महिनाअखेरीस ही सर्व माहिती संकलित केली जाईल. याद्वारे फुलपाखरांच्या संवर्धनासाठी महत्त्वाच्या माहितीचे एक रेकॉर्ड तयार केले जाईल.

प्रतीक्षा कोठुळे, वन्यजीव अभ्यासक, निसर्ग संवर्धन संस्था, नाशिक

Pratiksha Kothule, Wildlife Scholar, Nature Conservation Institute, Nashik

Related Stories

No stories found.