Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यारामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना; 25 हून अधिक भाविक पडले विहिरीत

रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना; 25 हून अधिक भाविक पडले विहिरीत

इंदूर | Indore

रामनवमीचा (Ram Navami) उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा होत असताना या उत्सवाला आज मध्यप्रदेशातील इंदूर मध्ये गालबोट लागला आहे. रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्यामुळे आनंदात दुःखाचे विरजण पडले आहे.

- Advertisement -

येथील स्नेह नगरजवळ असणाऱ्या पटेल नगरमध्ये (Patel Nagar) श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या सुमारे पन्नास फुट खोल विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक भाविक विहिरीत पडले असल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत काही जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात हजर होते. या ठिकाणी एक पायऱ्यांची विहिर (well) आहे, त्या विहिरीवर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आले होते.

पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सुमारे 20 ते 25 जण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.

… हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? ; अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली. याठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्यांमुळे मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत. पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी विहिरीत दोर टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याबरोबरच बचावकार्य करणाऱ्या पथकातील जवान विहिरीत उतरुन अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून, अग्निशमन दल, रुग्णवाहिका (Ambulance) तसेच स्थानिक बचाव कार्य दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, राज्य शासनानेही या घटनेची दाखल घेतली असून योग्य त्या कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या