सोमवारपासून भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेन, पाहा थांबे अन् वेळापत्रक

रेल्वे
रेल्वे

भुसावळ-देवळाली शटल कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गेल्या मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता पॅसेंजर ऐवजी मेमू एक्स्प्रेस (memu train) चालवण्याचा निर्णय भुसावळ(Bhusawal) रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १० जानेवारीपासून भुसावळ-इगतपुरी (Igatpuri) मेमू (Memu) ट्रेनला सुरुवात होणार आहेत. या गाडीला आरक्षित डबे असणार की नाही? यासंदर्भात काहीच स्पष्टीकरण नाही. परंतु अजूनही या गाडीचे आरक्षण सुुरु झाले नाही.

रेल्वे
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

ही गाडी आठ डब्यांची असणार आहे. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.

सध्या देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट आटोपल्यावरही गाडी सुरू होत नसल्याने सातत्याने गाडी सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी नोटिफिकेशन काढले आहे.

रेल्वे
पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोदींनी घेतली राष्ट्रपतींचे भेट : मोठी कारवाई होणार?

पॅसेंजरचे हे थांबे रद्द

भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही. यात वाघळी, पिंपरखेड, हिस्वल, समीट, पीजन, ओढा, लहाविट या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.

असे असेल वेळापत्रक

भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटेल. ७.२६ ला जळगाव ला पोहोचेल. १०. ०९ ला चाळीसगाव येथे पोहोचेल. १२.०८ ला मनमाड पोहोचेल व १३. २३ ला नाशिक नंतर इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९. ५ वाजता सुटेल. नाशिकला १०.३० वाजता तर जळगाव येथे ती सायंकाळी १६.२७ ला पोहोचेल तर भुसावळ जंक्शनवर ही गाडी सायंकाळी ५. १० वाजता पोहोचेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com