पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

नाशिकला 'एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य : भुजबळ
पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून (MUHS) येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील...

येथील नाविन्यपूर्ण अध्यासन केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटी रुपये निधी (Fund) उपलब्ध करून दिला जाईल. नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी प्राधान्य असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
Video : १७१ पोलीस उपनिरीक्षक सेवेत दाखल; पाहा दैदिप्यमान सोहळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे तर मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant), केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन (Bhumipujan of Savitribai Phule Pune University's Nashik sub-center building) पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
Photo Gallery : पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यातील खास क्षणचित्रे पाहा 'इथे'

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे, प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्राचार्य विश्वास गायकवाड, डॉ. विजय सोनवणे, डॉ. राजेश पांडे, डॉ. प्रफुल्ल गायकवाड, डॉ. अमित पाटील, डॉ. नंदू पवार, डॉ. तान्हाजी पवार, डॉ. मोतीराम देशमुख, सरपंच सुनीता निंबाळकर, माजी सरपंच पांडुरंग गडकरी यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
मान्सूनची प्रतीक्षाच! शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

यावेळी भुजबळ म्हणाले की, विद्यापीठाचे काम इतके वाढले आहे की, त्याचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता होती. आज हे उपकेंद्र उभे राहत आहे याचा आनंद आहे. नाशिकमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. मुंबई पुण्यानंतर नाशिकची शैक्षणिक वाटचाल अत्यंत वेगाने सुरु असून देशभरातील तसेच विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिकला येत आहेत.

आगामी काळातील नाशिकचा शैक्षणिक विस्तार व शिक्षणाच्या रुंदावलेल्या कक्षा लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सक्षमीकरण करून येथे विद्यापीठाचा 'नाशिक कॅम्पस' सुरु करण्याचा शासनाने दि. २४ जून २०१३ रोजी निर्णय घेतलेला होता.

२०१४ साली या उपकेंद्रासाठी मौजे शिवनई येथील ६२ एकर जागा निश्चित करण्यात आली होती. पण नंतरच्या पाच वर्षात या उपकेंद्राचे काम रखडले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली.

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २१ जूनला नाशकात; 'हे' आहे कारण

नाशिकमध्ये एज्युकेशन हब निर्माण व्हावे यासाठी नाशिकमध्ये होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे. युजीसी व एआयसीटीईच्या माध्यमातून विविध शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करून मोफत शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे.

पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
Visual Story : जेव्हा सुशांत सिंह राजपूतने बाऊन्सरवर उत्तुंग षटकार खेचला; मास्टर ब्लास्टरही झाला होता फिदा

महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करून येथे तज्ज्ञ शिक्षक, ऑडीओ व्हिज्युअल वर्ग, सुसज्ज वाचनालये निर्माण करण्यात येऊन ‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com