अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाचे अखेर भूमिपूजन

अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाचे अखेर भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या सातपूर बसस्थानकाचे (Satpur Bus Stand) अखेर शनिवारी (दि.8) लोकार्पण करण्यात येणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrasekhar Bawankule) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांच्या हस्ते स्थानकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) यांनी दिली. आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून

सुमारे तीन कोटी रुपये खर्चून सातपूर बसस्थानकाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत तीन वेळा भूमिपूजन (bhumipujan) झालेल्या या बस स्थानकाच्या उद्घाटनाला काही केल्या मुहूर्त लागत भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने सातपूरात 12 फेब्रुवारीला सर्वच पदाधिकारी उपस्थित हाते.

त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र वेळेच्या अभावी कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. सातपूर बस स्थानकात (Satpur Bus Station) कर्मचार्‍यांसाठीही निवार्‍याची सुविधा उभारण्यात आल्याने येथे कर्मचार्‍यांना मुक्कामीही राहता येणारआहे. त्यामुळे याठिकाणी लांब पल्ल्याच्या बसला थांबा मिळू शकणार आहे.

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) कडून येणान्या लांब पल्ल्याच्या सर्व बसेसला सातपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे सातपूरच्या प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. प्रत्यक्षात बसस्थानकाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडेही वीज जोडणीत अडचणी होत्या. एसटीच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकान्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर ठेकेदाराने थकबाकी 53 हजार 290 रुपये भरल्यानंतर वीज जोडणी करण्यात आली.

त्यामुळे आता बसस्थानक सुरू करण्यासाठीच्या सार्‍या अडचणी दूर झाल्याचे चित्र आहे. उद्घाटनाच्या दिवशी शनिवारी मान्यवरांच्या हस्ते पहिली बस रवाना केली जाणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com