नवीन संसद भवनाचे भूमीपुजन: २ वर्षांत पुर्ण होणार

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाची पायाभरणी केली. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेचे अधिवेशन नवीन इमारतीत आयोजित केले जावे यासाठी नवीन संसद भवन ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

नवीन संसद भवनात लोकसभा सध्याच्या सभागृहापेक्षा तीन पट मोठी असेल. राज्यसभेचा आकारही वाढेल.

नवे संसद भवन 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. याच सुमारास नवीन संसद भवनाच्या बांधकामासाही सुरुवात होणार आहे.

देशामध्ये जी सांस्कृतिक विविधता आहे, त्याचे चित्र नव्या संसद भवनात उमटणार आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी संसदेचे अधिवेशन नव्या संसद इमारतीत होईल. नव्या संसद भवनाची इमारत भूकंपरोधक असून इथे 1 हजार 224 खासदार एकत्र बसू शकतील, अशी व्यवस्था असेल. नवीन संसद भवनाच्या बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष तर 9 हजार जणांचा अप्रत्यक्ष सहभाग असेल असेही बिर्ला यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *