Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यास्मृती उद्यानाचे आज भूमिपूजन

स्मृती उद्यानाचे आज भूमिपूजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार व जीवनशैलीवर आधारीत नाशिकमधील पहिल्या भव्य स्मृती उद्यानाचे भूमिपूजन Smriti Udyan Bhumipujanआज (दि.28) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे Tourism Minister Aditya Thackeray यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 2.30 वा. चिंतामणी मंगल कार्यालयासमोर पंपिंग स्टेशन चौक गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम होणार आहे.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरेंचे बहुआयामी व्यक्तिमत्व व त्यांच्या विचारांशी जनसामान्यांची जुळलेली नाळ विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढील पिढीपर्यंत पोचावे या उद्देशाने ही योजना आखली आहे. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहयालाच्या उर्वरीत जागेचा कल्पकतेने वापर करीत या उद्यानात प्रामुख्याने बाळासाहेबांनी काढलेल्या काही व्यंगचित्रांची आर्ट गॅलरी, त्यांच्या भाषणाच्या ध्वनीफिती, चित्रफिती व मुलाखतींचा अमूल्य ठेवा असलेले दालन तयार केले जाणार आहे.

बाळासाहेबांचे नाटय व एकांकिकांविषयीचे प्रेम विचारात घेऊन त्यावर आधारीत सुसज्ज 200 आसनी ऑडीटेरियमदेखील येथे उभारण्यात येणार आहे. कोणत्याही विषयावर मुक्त संवाद साधण्यासाठी हाईड पार्कच्या धर्तीवर जागेचा विकास केला जाणार आहे. बाळासाहेबांचे साहित्य व वाचनावरचे प्रभुत्व विचारात घेवून त्यावर आधारीत वाचनालय व ई वाचनालयाची निर्मिती तसेच बाळासाहेबांचे साहसी व्यक्तिमत्व विचारात घेऊन अँडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हयातील गड-किल्ल्यांची प्रतिकृती उभारून गड-किल्ल्यांची माहिती देणारे आकर्षक दालन उभारले जाणार आहे. या उद्यानात पर्यावरणाचे योग्य प्रकारे संवर्धन करुन पर्यावरणवाढीस हातभार लावला जाणार आहे. या उद्यानाला गोदा किनार्‍याचा भाग असून त्याचा विकास होत असल्याने गोदा किनार्‍याचेही सुशोभिकरण होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या