Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या'नमामि गोदा' प्रकल्पाचे भूमिपूजन

‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे भूमिपूजन

नाशिक | प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी ‘नमामि गंगा’ ( Namami Ganga ) प्रकल्पाच्या धर्तीवर दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या विकासाकडे विशेष लक्ष देत सुमारे दोन हजार कोटी रुपये ‘नमामि गोदा’ ( Namami Goda ) प्रकल्पासाठी मंजूर केले आहे. हा प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण होईल व 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा पर्यंत ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा लाभ जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना होणार, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil )यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी (Nashik Mayor Satish Kulkarni ) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा ( Bhumipujan of Namami Goda Project आज (दि. 13) विविध साधुसंत तसेच मान्यवरांच्या उपस्थित तसेच केंद्रीय मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ना. पाटील बोलत होते.

गोदावरी नदीमुळे नाशिकच नाव जगाच्या नकाशावर कोरले गेलं आहे. दरवर्षी जगभरातून लाखो भाविक नाशिकला येत असतात. दर 12 वर्षांनी याठिकाणी भव्य कुंभमेळा होतो. तर गोदीवरी नदी पात्रात लाखो साधू महंत शाहीस्नान करतात. मंदिराची नगरी ओळख असणाऱ्या नाशिकचे सौंदर्य गोदावरी नदीमुळे आहे. गोदमाई ही नाशिककरांसह भाविकांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळाचा विषय आहे. मात्र गोदमाईची प्रदूषणाच्या गर्तेतून सुटका व्हावी, यासाठी नमामि गोदा प्रकल्प राबण्यात येणार आहे.

केंद्रातील मोदी सरकार ने हा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय जल मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना भेटले होते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला चालना मिळाली. दरम्यान ना. शेखावत हे माझे चांगले मित्र आहे, मी उद्या दिल्लीला जाणार आहे, दिल्लीत त्यांना भेटून नमामि गोदा प्रकल्पाचा डीपीआर आला की तो लवकरात लवकर मंजुर करून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मी त्यांना साद घालणार यासल्याची ग्वाही ना. पाटील यांनी यावेळी दिली.

नाशिक शहरातून जाणाऱ्या सुमारे 19 किलोमीटर लांबीच्या गोदावरी नदीच्या काठांचा विकास आणि सुशोभीकरण या अंतर्गत होणार आहे. गोदावरीसह नासर्डी, वालदेवी, वाघाडी या उपनद्या प्रदूषण्याच्या विळख्यातून मुक्त होणार आहे. औद्योगिक वसाहतीसह शहरांच्या विविध भागातील गटाराचे गोदा पत्रात मिसळणारे रसायन मिश्रित पाणी रोखणे, मलनिस्सारण केंद्राची उभारणी करणे, गोदावरी नदी पत्रातील गाळ काढून पाणी साठवण, वहन क्षमता वाढविणे अशी असंख्य काम नमामि गोदा या प्रकल्पा अंतर्गत पूर्ण होणार आहे. आगामी कुंभमेळाच्या आधी सम्पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेणार असा विश्वास ना. पाटील यांनी व्यक्त केला.

सतत पाठपुरावा केला – महापौर सतीश कुलकर्णी

नमामि गंगेच्या पार्श्वभूमी नमामि गोदा प्रकल्प आम्ही तयार केला, यासाठी महापौर झाल्यापासून सतत पाठपुरावा केला तर यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना दिल्लीत जाऊन भेटून आलो. ना. शेखावत यांनी याबाबत डीपीआर सादर करण्याची सूचना केली. भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ दिल्लीहुन परतण्यापूर्वी नाशिक महापालिकेला केंद्रीय जल मंत्रालयाकडून सविस्तर नमामि गोदेच्या डीपीआर सादर करण्याचे पत्र आले होते, मात्र प्रशासनाने डीपीआर तयार करण्यासाठी खूप वेळ लावला. जर हे काम वेळेत झाले असते तर नमामि गोदा प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले असते, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रशासनाने वेळ घेतल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाने भरपूर कामे केली. केंद्र सरकारच्या मदतीने आयटी पार्क असो की लॉजिस्टिक पार्क तसेच न्यू मेट्रो व नमामि गोदा असा हजारो कोटी रुपयांचा निधी नाशिक मध्ये आणून नाशिकच्या विकासात भर घालण्याचे काम केले आहे. आज माझ्या महापौर कार्यकाळाचा शेवटचा दिवस असून साधू महंतांच्या उपस्थितीत व त्यांच्या आशीर्वादाने ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे, याचे मला खूप समाधान वाटत असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे सहप्रभारी आ. जयकुमार रावल, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, आ.राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेविका शाहीन मिर्झा तसेच विविध साधू संत महंत तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या