भुजबळ खुर्चीवर बसताच आंदोलक आक्रमक

भुजबळ खुर्चीवर बसताच आंदोलक आक्रमक

नाशिक

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनस्थळी सर्वच राजकीय नेते आले होते. यावेळी पालकमंत्री, छगन भुजबळ यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यावरून वाद झाला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालताच वादावर पडदा पडला.

भुजबळ खुर्चीवर बसताच आंदोलक आक्रमक
sambhaji raje live ; राज्यातील समन्वयक आज चर्चा करणार, संध्याकाळी पाच वाजता आंदोलनाची दिशा ठरणार

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनस्थळी कोणासाठी खुर्ची नव्हती. सर्व नेते खालीच बसले होते. मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना बसायला खुर्ची दिली म्हणून मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला.

भुजबळ यांना बसायला खुर्ची का दिली? असा प्रश्न उपस्थित करत गोंधळ घातला. यावेळी काही काळ वातावरण तापले होते. त्यामुळे संभाजीराजे उभे राहिले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ते म्हणाले, ‘भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यांना खुर्चीवर बसू द्या. ते खुर्चीवर बसले तर काहीही अडचण नाही. आपण सगळ्यांनी मन मोठे ठेवा. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com