
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे....
याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आहे.
दरम्यान, भाऊसाहेब चौधरी हे थोड्याच वेळात नागपूर येथे शिंदे गटात करणार प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.