सिन्नर | प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पॅनलचा सख्ख्या भावाच्या पॅनलने पराभव केल्यामुळे ग्रामंचायत निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना जोरदार धक्का बसला आहे…
आमदार कोकाटे यांचे बंधू भरत शिवाजी कोकाटे यांच्या पॅनलने सोमठाणे येथील ग्रामपंचायतीत सात जागा जिंकत आमदार कोकाटे यांना मोठा धक्का दिला.
सोमठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार कोकाटे यांच्यासमोर घरातीलच सख्ख्या भावाचे आव्हान उभे ठाकले होते. भरत कोकाटे यांनी अकरा जागांसाठी पॅनलची घोषणा केली होती.
अकरा जागांपैकी जवळपास सात जागा या भरत कोकाटे यांच्या पॅनलला मिळाल्या. कोकाटे यांना गावातूनच नापसंती मिळाल्याने आमदार कोकाटेंना मोठा धक्का मानला जात आहे.