मोठी बातमी! भारतात लहान मुलांवरील लसीच्या ट्रायलला मंजुरी


मोठी बातमी! भारतात लहान मुलांवरील लसीच्या ट्रायलला मंजुरी

मोठी बातमी! भारतात लहान मुलांवरील लसीच्या ट्रायलला मंजुरी
Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेला हाहाकार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात लहान मुलांवरील कोरोना लसीच्या ट्रायलला मंजुरी देण्यात आल्याची माहिती 'एएनआय'ने ट्विटरवर दिली आहे.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस 2 ते 18 या वयोगटातील लसीकरणाच्या चाचण्यांसाठी वापरण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली असल्याचे 'एएनआय'ने ट्विटरवर सूत्रांच्या माहितीच्या आधारे म्हटले आहे. त्यामुळे भारतात लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दरम्यान, ही क्लिनिकल ट्रा्यल 525 मुलांवर दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये केली जाणार आहे.कमिटीच्या शिफारशीनुसार, भारत बायोटेकला फेज 3ची ट्रायल पूर्ण करण्यापूर्वी फेज 2 चा पूर्ण डेटा द्यावा लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com