Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रभारत बायोटेकची लस पुण्यात तयार होणार

भारत बायोटेकची लस पुण्यात तयार होणार

पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पुणे विभागातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. मुंबई महापालिकेप्रमाणे पुणे महानगरपालिकेलाही ग्लोबल टेंडरची परवानगी देण्यात आली आहे. तसेच भारत बायोटेकची लस तयार करण्यासाठी पुण्यात जमीन देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

Sputnik V लसीच्या एका डोसची किंमत किती ? आज जाहीर झाला दर

पुणे महानगरपालिकेच्यावतीने या कोविड सेंटरसाठी ३० खाटांची परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेच्यावतीने डॉक्टर, परिचारीका व औषधे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या काळात डॉक्टर, पॅरामेडीकल स्टाफ, पोलीस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी कर्मचारी वर्ग खूप चांगल्याप्रकारे काम करीत आहे. नागरिकांनीही दक्षता घेत घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी व नागरिक सहकार्य करत असून यापुढेही नागरिकांनी प्रशासनाला असेच सहकार्य करत कोरोना संसर्ग साखळी तोडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुण्यात सीरमची लस तयार होते. त्याप्रमाणे भारत बायोटेकची लस तयार करण्यासाठी पुण्यात जमीन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या वीज व इतर सर्व सुविधा लवकरात लवकर देणार असून साधारणपणे तीन महिन्यात या लसीचे उत्पादन पुण्यात सुरू होऊ शकेल. भारत बायोटेकची लस निर्मती सुरू झाल्यानंतर त्याचा राज्याला फायदा होणार आहे. अर्धी लस केंद्राला दिल्यानंतर उर्वरित अर्धी राज्याला देण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या