भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची डिलीव्हरी सुरु

लस
लस

हैदराबाद

सीरम इंस्टीट्यूटच्या कोवीशील्डच्या लसी देशभरात पोहचू लागल्यानंतर आज भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची डिलीव्हरीही सुरू झाली आहे. कोव्हॅक्सीनची पहिली खेप बुधवारी एअर इंडियाच्या विमानाने हैदराबादहून दिल्लीत पाठवण्यात आली. देशातील १३ शहरांत ही लस पोहचणार आहे.

भारत बायोटेकला त्यांच्या ५५लाख कोव्हॅक्सिन ऑर्डर दिली आहे. दिल्ली व्यतिरिक्त बंगळुरू, चेन्नई, पटना, जयपूर आणि लखनौसाठीही कोव्हॅक्सीन पाठवण्यात आली. केंद्र सरकार २९२ रुपयांत ३८.५ लाख लसी भारत बायोटेककडून घेणार आहे. तर १६.५ लाख लसी भारत बॉयोटक केंद्र सरकार मोफत देणार आहे.

जयपूरमध्ये एअर एशियाच्या फ्लाइटने कोव्हॅक्सिनचे ६० हजार डोज पोहोचले. त्यांना एअरपोर्टवरुन थेट ड्रग स्टोरमध्ये नेण्यात आले. कोवीशील्डचे डोजही आज संध्याकाळी जयपूर एअरपोर्टवर पोहोचण्याची आशा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com