शेतकरी आंदोलकांचा आज भारत बंद

देशभरातून प्रतिसाद; विरोधी पक्षांचा पाठिंबा
शेतकरी आंदोलकांचा आज भारत बंद
USER

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

केंद्र सरकारने Central Government गेल्यावर्षी मंजूर केलेल्या तीन कृषीविषयक कायद्यांना Three agricultural laws एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आज सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदची हाक दिली आहे.

बंदला देशभरातून अनेक समाजघटकांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक विरोधी पक्षांनी बंदला पाठिंबा दिला आहे. काही नेतेमंडळी शेतकर्‍यांसोबत आजच्या बंदमध्ये सहभागी होण्यास सरसावले आहेत.

आज सकाळी 6 ते संध्याकाळी 4 पर्यंत भारत बंद पाळला जाणार आहे. यादरम्यान सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, इतर संस्थांची कार्यालये, दुकाने, कारखाने, व्यावसायिक केंद्रे, सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारी कार्यालये, रुग्णालये, औषधांची दुकाने, बचावकार्य करणारे घटक यांची कामे सुरू राहतील. बंद स्वेच्छेने आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पाडला जाईल, असे संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आले.

शेतकर्‍यांच्या भारत बंदला Bharat Bandh अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव स्वत: बंदमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू सरकारनेदेखील बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेसुद्धा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. राजकीय पक्षांखेरीज बँक अधिकारी संघटनेनेसुद्धा बंदला पाठिंबा व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने आंदोलक शेतकर्‍याशी चर्चा करावी, अशी विनंती ऑल इंडिया बँक ऑफिसर्स फेडरेशनने केली आहे. तीन कृषिविषयक कायदे रद्द करावेत, अशीही मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.