Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभारत बंद : १८१ मेल एक्स्प्रेस आणि साडेतीनशे पॅसेंजर ट्रेन रद्द, दिल्लीच्या...

भारत बंद : १८१ मेल एक्स्प्रेस आणि साडेतीनशे पॅसेंजर ट्रेन रद्द, दिल्लीच्या वेशीवर वाहतूक कोंडी

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

केंद्र सरकारने (Central Government) सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेचा (Agnipath Scheme) विरोध दिवसेंदिवस अधिक होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील काही संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. दिल्लीला याचा मोठा फटका फटका बसला आहे….(bharat bandh 181 mail express and 348 passengers train cancelled)

- Advertisement -

दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस-वेवर (Delhi Gurugram Express) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी(Traffic Jam) झाली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली असल्याने दिल्ली पोलिसांकडून सीमेवर वाहनांची तपासणी केली जात आहे. याचा फटका वाहतुकीवर झाला असून मोठी कोंडी याठिकाणी झालेली बघायला मिळते आहे.

अग्निपथ योजना (Agnipath Scheme) रद्द करावी अशी आंदोलकांची मागणी आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक ठिकाणी तरुणांनी विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.

बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले असून सरकारी संपत्तीचे नुकसान झालेले आहे. यामुळे बिहार राज्यात सोमवारी साडेतीनशे ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच 20 जिल्ह्यातील इंटरनेट सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे.

दिल्लीतील शिवाजी ब्रिज रेल्वे स्टेशन परिसरात युवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या