Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याभाई जगताप मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष; कार्याध्यक्षपदी चरणसिंह सप्रा यांची निवड

भाई जगताप मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष; कार्याध्यक्षपदी चरणसिंह सप्रा यांची निवड

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार आणि कामगार नेते भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी नवी दिल्लीतून जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. जगताप यांच्याकडे संघटनेची धुरा सोपवून काँग्रेसने पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळले आहे.

- Advertisement -

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. त्यासाठी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू होते.

प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर चर्चेअंती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी आमदार चरणसिंह सप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नसीम खान, समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून अमरजितसिंह मनहास तर निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुरेश शेट्टी यांची निवड झाली आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना मुंबई काँग्रेसचे प्रभारी नेमण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या