पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; लाच मागणाऱ्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; लाच मागणाऱ्या आरोग्यमंत्र्याची हकालपट्टी

दिल्ली । Delhi

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आपले आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची (health minister Vijay Singla) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.

भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी घेतलेल्या या धडाकेबाज निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे. भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानतंर सिंगला यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कंत्राटासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्के कमिशन मागितल्याचा आरोपानंतर त्यांच्याविरोधात पुरावे सापडल्याची माहिती पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

दरम्यान पंजाब पोलिसांच्या (Punjab Polic) भ्रष्टाचारविरोधी पथकाने सिंगला यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. आता त्यांची आम आदमी पार्टीतूनही (AAP) हकालपट्टी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पंजाबचे आप प्रवक्ते मालविंदर कंग यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिंगला यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com