नाशिकमध्ये लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी गर्दीचा महापूर

नाशिकमध्ये लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी गर्दीचा महापूर

नाशिक

करोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात १२ मे १२ वाजेपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी सकाळी १० वाजेदरम्यान भाजी खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. जणू भाज्या आता मिळणारच नाही? या पद्धतीने गर्दी करुन कोरोनाला आमंत्रण दिले गेले.

करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात आज दुपारी बारा वाजेपासून दहा दिवसासाठी कडक लाॅकडाऊन लागू आहे. भाजीपाला विक्रीसह दूध व इतर सेवांबाबत जनसामान्यात गोंधळाची स्थिती आहे.

दरम्यान लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी पोलिसांनी कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. बाहेरील गाडी दिसताच ई-पास आहे की नाही त्याची तपासणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com