...अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही; बृजभूषण यांचा राज ठाकरेंना इशारा

...अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही; बृजभूषण यांचा राज ठाकरेंना इशारा

दिल्ली | Delhi

मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

...अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही; बृजभूषण यांचा राज ठाकरेंना इशारा
राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

राज ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे.

बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत आज रॅली काढली. यावेळी बृजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

...अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही; बृजभूषण यांचा राज ठाकरेंना इशारा
मराठमोळ्या अविनाश साबळेचा अमेरिकेत डंका; ३० वर्ष जुना 'तो' विक्रम मोडला

'राज ठाकरे दबंग नहीं, चूहा है, अपने बिल में रहता है' अशी घोषणाबाजी ठाकरेंविरोधात सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे हे उत्तर प्रदेशात गेल्यास त्यांचा भाजप खासदारासोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.