'या'मुळे शेतजमीन होतेय नापीक; कुटुंबासह शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

'या'मुळे शेतजमीन होतेय नापीक; कुटुंबासह शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

कोपरगाव तालुक्यातील (Kopargaon Taluka) कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्यात (Karmaveer Shankarao Kale Sugar Factory) निघणारी मळी तालुक्यातील कोळगाव माळ परिसरात आणून टाकली जात असल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या (farmers) शेतजमिनी नापीक (Farmland is barren) होत आहेत.

पिण्याचे पाणीही (drinking water) दूषित (Contaminated) झाल्याने माणसांसह जनावरांचे हाल होत आहे. वारंवार तक्रार करुनही परिसरात मळी टाकणे बंद होत नसल्याने येथील संपत दादा गवांदे यांनी कुटुंबासह आत्मदहन (self-immolation) करण्याचा इशारा दिला आहे. गवांदे यांची कोळगाव माळ येथील गट नंबर 192/2 येथे शेतजमीन आहे. येथेच ते आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह वास्तव्यास आहे. त्यांच्या जमिनीलगत काळे साखर कारखान्याच्या मालकीची जमीन आहे.

कारखान्यात तयार होणार्‍या दारू विभागातील मळी ही टँकरद्वारे (tanker) येथे आणून टाकली जाते. यामुळे गवांदे यांच्या जमिनीतही ही मळी मुरली जात असल्याने शेतजमीन नापीक (infertile) होत आहे. ही मळी जमिनीत जिरून गवांदे यांच्या खासगी विहिरीतील पाण्यात मिसळत असल्याने हे पाणीही पिण्यायोग्य राहिलेले नाही. पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवालही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (Groundwater Survey and Development Mechanism) यांच्यामार्फत प्राप्त झाला आहे. गवांदे यांनी वेळोवेळी काळे कारखान्यात जाऊन तक्रार करुनही कारखाना प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा त्यांचे म्हणणे आहे.

कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकार्‍यांनी अडवल्याचे गवांदे यांचे म्हणणे आहे. या संदर्भात गवांदे यांनी महसूल आयुक्त आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, प्रदूषण मंडळ यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यांनतर प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येत प्रत्यक्ष पाहणीही केली. पंचनामा करुन 2 नोव्हेंबर 2022 रोजी काळे कारखान्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. मात्र, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसून कारखान्यातील मळी टाकणेही बंद झाले नाही.

याबाबत तक्रार केली असता अधिकार्‍यांकडून कारखान्याची बाजू घेऊन गवांदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. शेती नापिक झाल्याने उत्पन्न मिळत नसल्याने गवांदे यांच्यावर शेती व्यवसाय कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे. कारखान्याकडून येथे मळी टाकणे बंद न केल्यास व शासनाकडून योग्य न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा गवांदे यांनी दिला आहे.

काळ्या पाण्याची शिक्षा

कारखान्याकडून कोळगाव माळ येतील आपल्या जमिनीत जरी मळी आणून टाकली जात असली तरी त्याचा परिणाम आसपासच्या कृत्रिम जलस्त्रोतांसह परिसरातील विहिरीतील पाण्यावर होत आहे. दिवसेंदिवस या स्त्रोतांतील पाणी काळे पडत पडून ते माणसांच्या नव्हे तर जनावरांच्याही पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे कारखान्याकडून या शेतकर्‍यांला एकप्रकारे काळ्या पाण्याची शिक्षाच दिल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com