सावधान ...अंगणवाडीतील पोषण आहाराचे सेवन करताय.. तर ही बातमी उघडेल तुमचे डोळे....

गरोदर माता,लहान मुलांचे आरोग्य धोक्यात; पालकांची तक्रार
File photo
File photo

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तालुक्यातील आसोदा येथील अंगणवाडीमार्फत (Anganwadi) गरोदर माता (pregnant mother) व त्यांच्या बालकांना देण्यात येणार्‍या शालेय पोषण आहाराच्या (School nutrition) सील बंद पॅकेटामध्ये मृत पाल (dead pal) आढळून आली आहे.या धक्कादायक प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे गरोदर माता, लहान मुलांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यासंदर्भात एका लाभार्थी पालकाने अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या मुलांनाही हा पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाने जळगाव तालुक्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणार्‍या सील बंद शालेय पोषण आहारात मृतपाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

त्याचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणात चौकशी करण्यात येवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप पंतगे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांच्याकडे देखील संबंधितांनी तक्रार केली असून याप्रकरणी पुरवठादाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

फक्त असोदा गावात नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी देण्यात आलेल्या पोषण आहार किटची तपासणी झाली पाहिजे. अनेकदा तक्रारी करून देखील अधिकार्‍यांकडून दखल घेतली जात नसल्याने या पुरवठादारांची हिंमत वाढली आहे. तरी यांच्यावर कठोर कारवाई करावी.

मनोहर पाटील, पालक

अंगणवाडीमार्फत देण्यात येणार्‍या आहारात मृत पाल आढळल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेली आहे. पुरवठादाराची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

डॉ. पंकज आशिया, सीईओ, जिल्हा परिषद जळगाव

एका अंगणवाडीत दिले जाणार्‍या सीलबंद पाकिटात मृत पाल असल्याची तक्रार आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. चना,मूगडाळीचे सॅपल घेतले असून प्रयोग शाळेत तपासणीसाठी रवाना करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

संदीप पतंगे,सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन,जळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com