सावध व्हा! करोनाचा संक्रमणाचा आलेख पुन्हा उंचावतोय

करोना
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 837 रुग्ण करोनाबाधित Corona patients झाले असल्याने जिल्ह्यात एकूण 2 हजार 566 रुग्ण सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांची देखील चिंता वाढली आहे. शहरात हे प्रमाण सर्वाधिक असून नागरिकांनी गर्दी टाळण्याचे appeal to avoid crowd आणि करोनासाठी असलेली त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनाने केले आहे.

गेल्या 24 तासात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 622 रुग्ण एकट्या नाशिक महापालिका क्षेत्रातील असून 173 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. मालेगाव महापालिका कार्यक्षेत्रात देखील 5 रुग्ण आढळून आलेले आहे.

यंदाच्या लाटेत करोनाचा संसर्ग झपाटयाने होत असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्हयातही करोनाचा धोका वाढू लागला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1800 रूग्णांंवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे यावेळी आरोग्य विभागाची आणि करोना नियोजनाची जबाबदारी असलेले अधिकारीही आता करोना पॉझिटिव्ह झाल्याने पुढील नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी दिंडोरीच्या खासदार तथा केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांना करोनाची लागण झाली. राज्यातही 70 आमदार आणि अनेक मंत्र्यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यावरून करोना संसर्गाचा धोका किती पटीने वाढतोय हे दिसून येते.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत अफवा पसरण्यास सुरुवात झाली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांनी अशा कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले नसून हे मेसेज अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी करोना आढावा बैठक घेऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये कोणतेही नवीन निर्बंध लागू करण्यात आले नसून दर आठवडयाला बैठक घेउन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविड सेंटर, रुग्णालये सज्ज

आठवडाभरात करोना रुग्णांची संख्या दीडपटीने वाढेल, अशी शक्यता गृहीत धरून ग्रामीण भागात एकूण रुग्णांच्या तुलनेत दीडपट खाटा तयार ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोविड केअर सेंटर व डीसीएचसी सुसज्ज तयार ठेवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांत उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात करोनाबाधित

जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काल (दि.6) रोजी जिल्ह्यातील दोन्ही खासदार करोनाबाधित झाल्यानंतर आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात हे बाधित झाले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून घरातच उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे

तर 45 टक्के रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये

सध्याची करोना रुग्णांची संख्या पाहता एकूण रुग्णांपैकी 65 टक्के रुग्ण गृहविलगीकरणात दाखल राहतील, असा अंदाज असून, 45 टक्के रुग्ण कोविड केअर सेंटर, डीसीएचसी व काही खासगी रुग्णालयात दाखल होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com