Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानोकरीच्या फसव्या लिंकचा हैदोस

नोकरीच्या फसव्या लिंकचा हैदोस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लॉकडाऊनमध्ये Lockdown अनेकांच्या नोकर्‍या Jobs गेल्या, व्यवसाय बंद पडले.त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण सध्या ऑनलाइन नोकरी online jobs शोधत आहेत. याचा फायदा सायबर हॅकरने घेतला आहे. अनेक बोगस संकेतस्थळ duplicate sites तयार करून याद्वारे बेरोजगारांवर जाळे टाकत आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांनी जनजागृती Rural Police सुरू केली आहे. कोणीही अशा फसव्या प्रलोभनांना बळी पडू नये असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात आहे.

- Advertisement -

सध्या अनेक बेरोजगार तरुण ऑनलाइन जॉब प्लेसमेंटवर नोकरी शोधत आहेत. याच संधीचा फायदा घेत सायबर हॅकर्सने जॉब प्लेसमेंटचे बोगस संकेतस्थळ तयार केले आहेत. त्यांनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक केल्यास वेगवेगळ्या कंपन्या आणि शासकीय भरतीची माहिती मिळते. तरुणांना नोकरीचे आमिष देत त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तरुणांची फसवणूक टाळण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे.

उच्चशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी ऑनलाइन अनेक संकेतस्थळ सुरू झाले. ऑनलाइन नोकरी देणार्‍या लाखो संकेतस्थळावर हजारो उच्चशिक्षित युवकांचा पत्ता, नाव, मोबाइल नंबर, आधार क्रमांक आणि फोटोसह डाटा आढळून येतो. बेरोजगारांचा डाटा काही कंपन्या थेट सायबर गुन्हेगारांना मोठ्या किमतीत विक्री करतात. अशा बेरोजगारांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करतात. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवतात व त्यांना जाळ्यात ओढतात. जॉब प्लेसमेंट अथवा गव्हर्नमेंट व्हॅकन्सी अशा अनेक नावाने लिंक पाठवितात. यासह सोशल मीडियावरदेखील नोकरीसंदर्भात लिंक पाठवून तरुणांना आकर्षित करतात. नोकरीची जाहिरात देतात. अशा नंबरवर कॉल केल्यास मोठ्या कंपनीमध्ये नोकरी देण्याचे सांगत प्रोसेसिंग फी भरण्यास सांगून गंडा घातला जात आहे.

बेरोजगार तरुणांनी सतर्क व्हावे

सोशल मीडियावरून किंवा एखाद्या बोगस संकेतस्थळावरील लिंकला प्रतिसाद देऊ नका, अर्ज करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या जाहिरात अधिकृत आहे का? याची खात्री करा. शासनाच्या किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरोखर भरती आहे का याची खात्री करा. नोकरी देण्याचे सांगत ऑनलाइन जॉब लेटर पाठवत पैशांची मागणी होत असेल तर सतर्क व्हा. तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

सचिन पाटील, अधीक्षक, ग्रामीण पोलिस

- Advertisment -

ताज्या बातम्या