महिला आणि पुरुष क्रिकेटर्समधील भेदभाव दूर करण्यासाठी BCCI चा मोठा निर्णय

महिला आणि पुरुष क्रिकेटर्समधील भेदभाव दूर करण्यासाठी BCCI चा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान मानधन दिलं जाणार असल्याची मोठी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. जय शाह यांनी ट्वीट करत ही घोषणा केली आहे.

जय शाह यांनी म्हंटल आहे की, “भेदभावाचा सामना करण्यासाठी BCCI चे पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.”

जय शाह यांनी ट्वीटमध्ये महिला खेळाडूंना किती मानधान मिळणार याचीही माहिती दिली आहे. “पुरुष खेळाडूंप्रमाणेच महिला खेळाडूंना समान मानधन दिलं जाईल. त्यानुसार कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख आणि टी-२० साठी तीन लाख मानधन असेल,”

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com