Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाकडून मूलभूत कामे अपेक्षित

मनपाकडून मूलभूत कामे अपेक्षित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या निवडणुकीची (Municipal elections) रणधुमाळी सुरु झाली असून सगळ्याच प्रभागातील चौकाचौकात, पारांवर गप्पा रंगायला सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवकांना (corporators) त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळणार कि मतदार (voters) नवीन चेहर्‍यांना संधी देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

यातच सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांना महापालिकेकडून (Municipal Corporation) नक्की काय अपेक्षित आहे. याचा विचार करणे होय.या निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर दैनिक देशदूतने (deshdoot) ‘जनता की बात’ (janta ki baat) मध्ये प्रभाग क्र. 5 (Ward no. 5) मधील मतदारांशी संवाद साधून आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याबाबत जाणून घेतले. मतदारांनी दिलखुलासपणे आपल्या अपेक्षा आमच्यासमोर मांडल्या आहेत.

अभ्यासिका आणि वाचनालय ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्ययावत वाचनालयाची सोय असली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींयुक्त अभ्यासिका आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रभागात उपाययोजना झाल्या पाहिजेत. रस्ते, पाणी, विजेच्या समस्या सोडविणे हे मूलभूत कार्य करणारा नगरसेवक यावेळी पाहिजे.

निखील काकड

नगरसेवक तरुणांना सोबत घेऊन चालणारा पाहिजे. पावसाळ्यात पाणी साचून तळे साचते त्यासाठी गटारींची उपाययोजना व्हायला हवी. संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, हा दृष्टीकोन समोर ठेऊन काम व्हायला हवे. प्रभागामध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचतात त्याची वेळेवर विल्हेवाट लागावी, यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा.

धनंजय कोठुळे

रस्ते ड्रेनेज लाईट या मूलभूत सेवा सुविधा लवकरात लवकर पुरवून प्रभागाचा विकास करणारा नगरसेवक पाहिजे. नागरिकांना गरज असेल तेव्हा फोन केल्यावर सुद्धा उपलब्ध होईल असा नगरसेवक पाहिजे.

विजय चोथवे

भावी पिधीसाठीचा नगरसेवक हा तरुणांना पुढे नेणारा पाहिजे. ड्रेनेज वेळोवेळी साफ व्हावे, जेणेकरून पाणी साचणार नाही. किरकोळ समस्या सोडणारा असा नगरसेवक अपेक्षित आहे.

गणपत मोरे

- Advertisment -

ताज्या बातम्या