शिवकालीन बाराखडी कला वारसा टिकावा

गोंधळी कला जोपासण्यास नव्या पिढीकडून उपेक्षा
शिवकालीन बाराखडी कला वारसा टिकावा

पिंपळगाव । राजेंद्र पवार Pimpalgaon

गोंधळी समाजाची ( Gondhali Community )बाराखडीची कला आता पुढील पिढीला फक्त पुस्तकातच वाचायला मिळणार आहे. या समाजाचा वारसा आता पुढे चालवण्यास सध्याची पिढी तयार होत नसल्याची खंत गोंधळ्याची कला जोपासणार्‍या शिंदे बंधूंनी व्यक्त केली.

पिंपळगाव बसवंतला 15-20 वर्षांपासून हा गोंधळी समाज कधी दिसून आला नाही. ‘भोप्याच्या खुणा ह्या भोप्यालाच माहिती’ अशी म्हण प्रचलित आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सेनापती तानाजी मालुसरे यांच्याकडेच ही बाराखडी बोटावर इशारे करून सांगण्याची शिवकालीन कला आहे. या कलेचा वापर मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी केला होता. तीच कला आज आमची सातवी पिढी जपत असल्याचे रामनगर (शेवगाव, जि.अहमदनगर) येथील गोंधळी दादा उत्तम शिंदे व शरद उत्तम शिंदे यांनी सांगितले.

गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यात कवड्यांची टोपी व थोड्याफार अंतरावर असलेल्या एका हातात तुणतुणे, एका हाताने संबळ वाजवून दान देणार्‍याच्या नावाचा सुरात जयजयकार करणारे हे कुटुंब वर्षातून सहा महिने महाराष्ट्रभर फिरते. एका गावाला पाच ते सहा वर्षांतून येणे होते. खेडेगावात अजूनही धान्य देतात. शहरी भागात मात्र पैसे मिळतात. मात्र मिळणार्‍या पैशातून कुटुंबाची उपजीविका महागाईच्या युगात भागवली जात नसल्याने आमच्या कुटुंबातील भावी पिढी या कलेकडे येण्यास उत्सुक नाही. शासनाने मानधन सुरू केल्यास कला टिकून राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिंदे बंधूंनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com